बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

27 जुलैबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नागरिकांना केलं ‘हे’ आवाहन

मुंबई | राज्यात मुसळधार पावसाने नुकसान केलं आहे. कोकण विभागाला याचा मोठा फटका बसला. काही ठिकाणी दरड कोसळली तर काहींच्या घरात पाणी शिरून पुर्णपणे घरं उद्ध्वस्त झालीत. अशातच दोन दिवसांवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आला आहे. मात्र राज्यावर आलेल्या या संकटामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्वांना एक आवाहन केलं आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत. अनेकांच्या कुटुंबियांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. वाढदिवसानिमित्त कुणीही अभीष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये. फलक, पोस्टर्स लावू नयेत, सोशल मीडिया आणि ईमेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू असं उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्यात कोरोनाचं संकट कायम आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आरोग्याचे नियम कटाक्षानं पाळत राहणं गरजेचं आहे. त्यामुळे वाढदिवसाचे कुठलेही जाहीर कार्यक्रम करू नये, असंही आवाहन उद्धव ठाकरेंकडे केलं आहे.

दरम्यान, अतिवृष्टी भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूणच्या दौऱ्यावर आहेत. आज मुख्यमंत्री चिपळूण भागात आले होते. या पाहणी दौऱ्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे दुकानदारांनी त्यांची व्यथा मांडली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना मदतीचं आश्वासन दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

भास्कर जाधवांना एवढा माज कसला?, सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप

चिपळूणमध्ये मुख्यमंत्र्यांनी हात जोडणं भास्कर जाधवांना रुचलं नाही, पळत जाऊन म्हणाले…

चिपळूणमध्ये मदत मागणाऱ्या महिलेवर भास्कर जाधवांनी हात उगारला, पाहा व्हिडीओ

“मुख्यमंत्र्यांचे पाय पांढरे आहेत का हे एकदा पाहावं लागेल”

मुख्यमंत्री बाहेर पडत नाही म्हणणाऱ्या नारायण राणेंना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More