बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्धव ठाकरे जबरदस्त कमबॅक करण्याच्या तयारीत; घेतला मोठा निर्णय

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर आणि 40 आमदारांच्या घरफोडी नंतर शिवसेनेला (Shivsena) तिच्या स्थापनेपासूनचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. त्यातच आता त्यांच्या हातातून मुंबई महानगरपालिका (BMC) काढून घेण्याच्या तयारीला भाजप आणि शिंदे गट लागलेला आहे. शिवसेना आता शिंदे गटाला मिळालेल्या आमदार, नेते आणि पदाधिकाऱ्यांना एक एक करून नारळ देत आहे. तेव्हा आता शिवसेनेला नव्याने पक्षबांधणी आलीच.

आता याच नव्याने पक्षबांधणीच्या कार्यक्रमासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) महाराष्ट्र दौरा करणार आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ते महाराष्ट्र दौरा करणार आहेत. सरकार पडल्यानंतर उद्धव ठाकरेंचा हा पहिला दौरा आहे. या दौऱ्यात ते पाच मुद्द्यांकडे जास्त भर देणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.

उद्धव ठाकरेंसमोर पहिले मोठे आव्हान आहे ते म्हणजे पक्षाला लागलेली गळती रोकणे. कराण एक एक करुन शिवसेनेतील जुने आणि मोठे नेते पक्षाला राम राम करत आहेत. दुसरे म्हणजे आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणूका. शिवसेनेने आता अनेक जिल्हाप्रमुखांची हाकलपट्टी केली असल्याने त्यांना नवा जिल्हाप्रमुख नेमणे आणि पुन्हा सर्व जिल्हा पिंजून काढणे ही मोठी कामे आहेत.

तिसरे आव्हान म्हणजे बंडखोरी केलेल्या आमदारांना टाळ्यावर आणणे. त्यांना आगामी निवडणूकांत कसे घरी बसवता येईल हे मोठे जोखमीचे काम सध्या उद्धव ठाकरेंना आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देताना मी अजून मैदान सोडले नाही असे म्हंटले होते. ते त्यांना या दौऱ्यात सिद्ध करायचे आहे. तेव्हा शिवसेनेचा हा दौरा विविध कारणांनी महत्वपूर्ण ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

“शरद पवार कधी घरात बसतात आणि मी पार्टी सोडून जातो”

अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे भाज्या महागल्या; दर आणखी वाढण्याची भीती

रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेचे अंतरिम राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली!

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शकाचा राहत्या घरी आढळला मृतदेह

सुष्मिता डेट करत असलेल्या ललित मोदीची संपत्ती आली समोर; वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More