बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आजी-माजी मुख्यमंत्री एकमेकांच्या समोर; कोल्हापुरात उद्धव ठाकरे अन् फडणवीसांची धावती भेट

कोल्हापूर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोघेही आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. पूरग्रस्त भागाची पाहणी करत असतााना दोघेही एकमेकांसमोर आले. यानंतर फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बोलणं देखील झाल्याचं कळतंय. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते यांची ही भेट उभ्या उभ्या झाली. ह्या भेटीच्यावेळी फडणवीसांसोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील होते. फडणवीसांनी देखील ट्विट करत या भेटीबाबत माहिती दिली आहे.

शाहूपुरी भागात दौऱ्यावर असताना अनेक नागरिकांशी संवाद साधला. या भागात नागरिकांशी संवाद साधत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी हे सुद्धा तेथे आले असता पूरग्रस्तांच्या व्यथा त्यांना सांगितल्या आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याची विनंती केली, असं ट्विट फडणवीसांनी केलं आहे.

दरम्यान, दोन नेत्यांची जी उभ्या उभी भेट झाली त्यात नेमकं फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना काय सांगितलं याची सर्वांना उत्सुकता लागली. नंतर माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी त्याचा खुलासा केला. जर मुख्यमंत्र्यांनी जर बैठक बोलवली तर आम्ही त्या बैठकीला हजर राहु असं मी त्यांना कळवलं.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! महिला डाॅक्टरला तब्बल तीन वेळा झाली कोरोनाची लागण

‘तुम्ही कसल्या कायदा सुव्यवस्थेच्या गप्पा मारताय?’; संजय राऊत आक्रमक

बाॅक्सिंगमध्ये भारताचं पदक निश्चित; लवलीना बोर्गोहेनची दमदार कामगिरी

“ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, नाहीतर….”

पुणेकरांसाठी खुशखबर! ‘या’ तारखेपासून सुरु होऊ शकते मेट्रो

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More