Uddhav Thackeray | महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे सर्वच पक्ष आता निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवरच शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी कॉँग्रेस नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या.
दिल्लीत झालेल्या या भेटीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) व राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याशी उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीतील जागावाटप आणि रणनीतीबाबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
उद्धव ठाकरे यांनी घेतली काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांची देखील भेट घेतली आहे. या भेटीनंतर राज्यात आता वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार, अशा चर्चा आता होऊ लागल्या आहेत.
त्यातच उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत मोठं भाष्य केलं आहे. “आमचा उद्देश हा महाराष्ट्राला लुटणाऱ्याला पराभूत करणे हाच आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेता येईलच. मी मुख्यमंत्री असताना चांगले काम केले असेल तर मविआतील माझ्या सहकाऱ्यांनीच मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीसंदर्भात निर्णय घ्यावा.”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अद्याप मविआने मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत काहीही निर्णय घेतला नाहीये. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली वारीवरून आता राजकारणात वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत.
दुसरीकडे, उद्धव ठाकरेंच्या दिल्ली वारीवर महायुतीकडून जोरदार टीका केली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “उद्धव ठाकरे हे पहिले आम्हाला चिडवायचे की, तुम्हाला दिल्ली दरबारी जाऊन निर्णय करावे लागतात. आज त्यांच्यावर देखील हीच परिस्थिती आलीये. त्यांना अपॉइंटमेंट घेऊन मुख्यमंत्रिपदासाठी याचना करावी लागतेय”, असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे.
News Title : Uddhav Thackeray meets senior Congress leaders
महत्त्वाच्या बातम्या-
विधानसभेला महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला?, अजित पवार म्हणाले..
मोठी बातमी! ”या’ योजनेअंतर्गत 50 हजार युवकांना मिळणार ‘इतके’ रुपये
समंथाचा एक्स नवरा पुन्हा पडला प्रेमात; ‘या’ अभिनेत्रीशी थाटणार दुसरा संसार
RBI चे नवीन पतधोरण जाहीर; तुमचा कर्जाचा EMI वाढणार की घटणार?
नागपंचमीच्या दिवशी ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी, तुमच्या आयुष्यात येणार नाही संकट!