बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सर्वात निष्क्रिय मंत्री म्हणून उद्धव ठाकरेंची इतिसाहात नोंद होईल”

मुंबई | राज्यात नगरपंचायत निवडणुकांच्या( Nagar Panchayat elections) प्रचारसभांमध्ये राजकीय नेत्यांनी  एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या आणि मंगळवारी मतदान पार पडत आहे. अनेक नगरपंचायतमध्ये महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरूद्ध भाजप(BJP) असे चित्र आहे. त्यातच आता भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.(Nilesh Rane criticized CM Uddhav Thackeray)

सर्वांत निष्क्रीय मंत्री म्हणून इतिहासात उद्धव ठाकरे यांची नोंद  होईल, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे. तसेच भाजपला तालुक्यातील चारही नगरपंचायत निवडणुकांमध्ये मताधिक्य मिळेल,असा विश्वास निलेश राणे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहेे. विरोधकांनी किती भानगडी लावण्याचा प्रयत्न केला तरी त्यांची उंची आणि अक्कल तेवढीचं असल्याने ते भानगडी लावण्याचा प्रयत्न गेल्या दोन वर्षांपासून करता आहेत, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

मात्र, आमचे कार्यकर्ते जनतेला त्रास होऊ नये निवडणूक शांततेत पार पडावी याकरिता जनतेत शांत राहून काम करत आहेत. आपल्याया विकास हवा आहे. भांडण नको आहेत, असं  निलेश राणे यांनी म्हटलं आहे. परंतु,  शिवसेना (ShivSena) विरोधक असतील त्यांना भानगडी हवीय, विकास नकोय, हाच फरक आहे, असं निलेश राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री जरी शिवसेनेचा असला तरी त्याचा महाराष्ट्राला काही उपयोग नाही. 40 दिवस घरी बसले आणि स्वत:चा चार्ज देखील कोणाला दिला नाही. असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काही कामाचे नाहीत. त्यांचे आमदार काय कामाचे आहेत ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून जर कोणाची नोंद होईल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची होईल, अशी घणाघाती टीका निलेश राणे यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

iphone 13 सिरीजवर मिळतेय ‘इतक्या’ हजार रुपयांची सूट, जाणून घ्या ही बंपर ऑफर

ओबीसी आरक्षणासंदर्भात केंद्र सरकार उचलणार ‘हे’ मोठं पाऊल

महाराष्ट्र गारठणार! येत्या 24 तासात कडाक्याची थंडी, तज्ज्ञांचा इशारा

धक्कादायक! ‘या’ महिला सरपंचावर आली चक्क भीक मागण्याची वेळ

कोरानाचा परिणाम आता स्पर्म काऊंटवर? संशोधनातून ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More