त्यांना धरणाच्या आजूबाजूला जाऊ देऊ नका; उद्धव ठाकरेंचा अजित पवारांवर निशाणा

उद्धव ठाकरे

पुणे | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राजगुरुनगरमध्ये आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. 

धरणं सुकली आहेत. त्यामुळे मला राष्ट्रवादीवाल्याची भीती वाटते, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

त्यांना धरणाच्या आजूबाजूला जाऊ देऊ नका. त्यांना म्हणा आम्हाला माफ करा. घरात बसून बोंबला पण धरणाच्या आजूबाजूला येऊ नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

दरम्यान, शिवाजीराव आणि आमच्यावर टीका करण्याच्या आधी तुझ्या काकाला विचार नक्की पाठिंबा आहे की विरोध, असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी विचारला.

महत्त्वाच्या बातम्या-

-चंद्रकांत पाटलांनी सांगितला मंत्री होण्याचा फायदा…  

-…अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरु; राज ठाकरेंचा सरकारला इशारा

-काहीही झालं तरी एमआयएमशी असलेली मैत्री तोडणार नाही- प्रकाश आंबेडकर

-टोपी घातली म्हणून कोणी नेताजी बनत नाही; शोभा डे यांचे मोदींवर टीकास्त्र

-…तर सरपंचही खासदारापेक्षा वरचढ ठरेल- संजय राऊत

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या