कासव होईल पण धरणात लघुशंका करणारा अजित पवार होणार नाही!

औरंगाबाद | मी शेळी, गांडूळ एवढंच काय कासवही व्हायला तयार आहे, पण धरणात लघुशंका करणारा अजित पवार होणार नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. ते मराठवाड्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर आले असताना बोलत होते.

अजित पवार यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली होती. शिवसेना वाघ कसली?  शेळी, गांडूळ, ससा नव्हे… ससा तरी गोंडस असतो, शिवसेना कासव आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्याला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं.

राष्ट्रवादीने आधी डल्ला मारला आणि आता तेच हल्लाबोल करत आहेत. डल्ला मारणाऱ्यांनी हल्लाबोल करु नये, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.