शिवसेनेची सत्ता येऊ द्या, बेळगाव-कारवार महाराष्ट्रात आणू!

उद्धव ठाकरे

कोल्हापूर | शिवसेनेची सत्ता येऊ द्या, कर्नाटकव्याप्त भाग महाराष्ट्रात आणून दाखवतो, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. ते गडहिंग्लजच्या नेसरीमध्ये आयोजित सभेत बोलत होते. 

कोल्हापूरकर सारखे मंत्रिपद मागतात. तुमच्या जिल्ह्यात ऑलरेडी एक मंत्रिपदाचे पार्सल आहे, त्याने कोल्हापूरकरांच्या विकासासाठी काय केले? अशी विचारणा करत त्यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. 

सभेच्या निमित्ताने चंदगड भगवे करून दाखविले परंतु तेवढ्याने भागणार नाही राज्यात शिवसेनेला सत्ता द्या. कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही, असं ते म्हणाले.