आता माघार नाही!!! शिवसेनेने स्वबळावर लढावे ही तर जनतेची इच्छा!

उद्धव ठाकरे

मुंबई | युती न करता आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेने स्वबळावर लढावे ही जनतेचीच इच्छा आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. ते पत्रकारांशी बोलत होते. 

केवळ मंत्रालयाला जाळय़ा बसवून या आत्महत्या थांबणार नाहीत. सरकारच्या कारभारालाच भोकं पडली आहेत, ती कारभाराची जाळी आधी बुजवा, असा घणाघात त्यांनी सरकारवर केला.

आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची मागणी बाळासाहेबांनी 50 वर्षांपूर्वीच केली होती. दुर्दैवाने पवारांना बाळासाहेब समजायला 50 वर्षे लागली… आणि काहींना तर अजूनही समजले नाहीत, असंही ते यावेळी म्हणाले.