Top News विधानसभा निवडणूक 2019

खोटं नातं मला ठेवायचं नाही…. आमच्यावर पाळत ठेऊ नका; उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

मुंबई |  तुम्ही जर खोटं बोलत असाल तर मला हे खोटं नातं ठेवायचं नाही.  खोटं बोलणाऱ्यांसोबत कशी सत्ता स्थापन करायची, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर शिवसेनेला चर्चा करायला वेळ आहे पण त्यांनी आमच्याशी चर्चा केली नाही, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली होती. त्यावर खोटं बोलणाऱ्यांनी आमच्यावर पाळत ठेऊ नका, अशी खोचक सल्ला त्यांनी भाजपला दिला आहे.

देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांचा संदर्भ घेऊन माझ्यावर खोटेपणाचा आरोप केलाय. मी देवेंद्रजींना सांगू इच्छितो, अमित शहा आणि कंपनीने कितीही आमच्यावर खोटेपणाचा आरोप केला तरी जनता पुरेपूर ओळखून आहे की खोटे कोण बोलतो आणि सत्य कोण बोलतो, अशा शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं.

दरम्यान, मी शिवसेनाप्रमुखांना वचन दिलं आहे की मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेचा माणूस मुख्यमंत्री म्हणून बसलेला दाखवीन आणि ते मी पाळणार म्हणजे पाळणारच, असं म्हणत त्यांनी पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असं सांगितलंय

महत्त्वाच्या बातम्या-

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या