Top News विधानसभा निवडणूक 2019

…तोपर्यंत देवेंद्र फडणवीसांसोबत बोलणार नाही; उद्धव ठाकरे आक्रमक

मुंबई |  अडीच वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याचं ठरलंच नव्हतं, या भाजप नेत्यांच्या दाव्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार समाचार घेतला आहे. लोकसभेला भाजपमध्ये आणि आमच्यामध्ये ठरूनही आता देवेंद्र फडणवीस खोटं बोलत आहेत. जोपर्यंत ते आम्ही खोटं बोललो असं मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे घराणं संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. आमचा ठाकरी बाणाही जनतेला माहित आहे. ठाकरे घराण्यावर पहिल्यांदाच कुणीतरी खोटारडेपणाचा आरोप केला आहे, अशी टीका त्यांनी केली.

मुख्यमंत्रीपदाचा शब्द देताना त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले होते की हे जर आता जाहीर झालं तर मला पक्षाअंतर्गत प्रॉ़ब्लेम होईल आणि आता भाजप शब्दाचे खेळ कसे करतात, शब्द कसे फिरवतात हे आज मला कळलं, असंही उद्धव म्हणाले आहेत.

तुम्ही जर खोटं बोलत असाल तर मला हे खोटं नातं ठेवायचं नाही.  खोटं बोलणाऱ्यांसोबत कशी सत्ता स्थापन करायची, असा सवाल त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या