शिवसेनेचा पुन्हा एकदा सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा

मुंबई | सरकारमध्ये आम्ही अर्धे-मुर्धे असून जेव्हा भूमिका घ्यायची तेव्हा भूमिका नक्की घेणार, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिलाय. परळमध्ये आयोजित वृत्तपत्र संघटनांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

तुम्ही म्हणाल नाराज आहात तर सत्तेतून बाहेर का नाही पडत? मी भूमिका घेत असतो. पण माझाही काही विचार आहे. ज्यावेळी भूमिका घ्यायची त्यावेळी ती घेणार. माझ्या स्वार्थासाठी नाही तर मराठी आणि हिंदूंसाठी घेणार, असं ते म्हणाले. 

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियातून त्यांची जोरदार खिल्ली उडवण्यास सुरुवात झालीय.