“चोरी करणारे गद्दारच”; कामराच्या गाण्याला उद्धव ठाकरेंचं समर्थन

Nashik News

Uddhav Thackeray | स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक गाण्याने वाद निर्माण केला असतानाच, उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावर रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कामराच्या बाजूने उघड पाठिंबा दर्शवत अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधलाय.

उद्धव ठाकरेंनी कामराच्या गाण्याला दिलं समर्थन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कुणाल कामराच्या (Kunal Kamra) गाण्याला “सत्यावर आधारित जनभावना” असे म्हणत त्याचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, “कामराने जे गाणं केलं, ते सत्य बोलणं आहे. आज आम्हीही म्हणतो – चोरी करणारे गद्दारच आहेत.”

उद्धव ठाकरे यांनी हेही स्पष्ट केलं की मुंबईतील खार परिसरातील स्टुडिओवर झालेली तोडफोड शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नव्हे, तर शिंदे गटाच्या SNC लोकांनी केली असावी. त्यांच्यानुसार, भेकड लोकांनी आपल्या नेत्यावर टीका झाली म्हणून हे हाणामारीचे प्रकार केले. “अभिव्यक्ती स्वातंत्र्य केवळ सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी नसावं,” असं सांगत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

फडणवीसांनाही घेरलं, अन्य मुद्द्यांवरही टीका

उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही लक्ष्य केलं. “मुख्यमंत्र्यांचे काहीच चालत नाही, पोलिसांचा दरारा संपवण्याचं काम सुरु आहे,” असं ते म्हणाले. त्यांनी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावरही भाष्य करत, “हातात हातकड्या असलेल्या आरोपीकडून पिस्तूल कसं घेतलं गेलं?” असा थेट सवाल उपस्थित केला.

पुढे बोलताना त्यांनी नागपूरच्या दंगलीवरून सरकारला जाब विचारला. “गृहमंत्री तुम्हीच आहात ना? मग नागपुरात दंगल कशी होते?” असा सवाल करत त्यांनी संताप व्यक्त केला. शेवटी, “कामराचं गाणं ऐका, जर ‘सत्यमेव जयते’ नको असेल, तर ‘गद्दामेव जयते’ करा” अशी खोचक टीका करत त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे नाव न घेता निशाणा साधला.

 Title : Uddhav Thackeray on Kunal Kamra Satirical Song

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .