मुंबई | राज्यावर कोरोनाचं गहिरं संकट गडद होत असताना मुंबईतील लालबागचा राजा गणेश मंडळाने कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. यंदाची वर्षी गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा न करता सलग 11 दिवस आरोग्यसेवा करून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय लालबाग गणेश मंडळाने घेतला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लालबागचा राजा गणेश मंडळाने घेतलेल्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. त्यांनी खास ट्विट करून मंडळाचं अभिनंदन केलं आहे. या निर्णयाने राज्याच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ मिळणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ” लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा लालबागचा राजाचा गणेशोत्सव साजरा न करता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. लालबागच्या राजाने जनतेसाठी नेहमीच आदर्श ठेवला आहे. या निर्णयाने राज्याच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ मिळणार आहे”.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने
यंदा लालबागचा राजाचा गणेशोत्सव साजरा न करता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. लालबागच्या राजाने जनतेसाठी नेहमीच आदर्श ठेवला आहे. या निर्णयाने राज्याच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ मिळणार आहे. https://t.co/vjQEwEjdka— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 1, 2020
दुसरीकडे कोरोना लढ्यात जे पोलीस शिपाई आणि अधिकारी शहीद झाले आहेत त्यांच्या कुटुंबांचा सन्मान मंडळाच्या वतीने केला जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 25 लाख रुपये देण्याची घोषणाही मंडळाने केली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, लग्नात हजर 100 पेक्षा अधिक जणांना कोरोना
‘विठ्ठला मानवाने या संकटापुढे हात टेकले….आतातरी चमत्कार दाखव’; मुख्यमंत्र्यांची विठुरायाला साद
महत्वाच्या बातम्या-
आम्हाला सत्काराची अपेक्षा नाही, पण तिरस्कार तरी करु नका- रामदेव बाबा
आषाढी एकादशीनिमित्त अमिताभ बच्चन यांनी दिल्या मराठीमध्ये शुभेच्छा, म्हणाले….
‘साहेब माझा विठ्ठल’, पुढचा 1 महिना आव्हाड करणार पवारांवर ‘खास सिरीज’!