महाराष्ट्र मुंबई विधानसभा निवडणूक 2019

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार- उद्धव ठाकरे

मुंबई | महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री शिवसैनिकच होईल. असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं आहे. मुंबईतल्या हॉटेल ‘द रिट्रीट’वर शिवसेनेच्या सर्व आमदारांना ठेवण्यात आलं आहे. या आमदारांसोबत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात आता आपलचं सरकार येणार आहे. आता पालखीचे भोई व्हायचं नाही तर शिवसैनिक पालखीत बसवायचा आणि तो मी कोणत्याही परिस्थितीत बसवणारच, असं उद्धव ठाकरेंनी म्हणालेत. त्यामुळे आता सत्तास्थापनेच्या हालचाली वाढल्या आहेत. दुसरीकडे भाजपच्या कोअर कमिटीची बैठक बोलवण्यात आली आहे.च

शिवसेना अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम आहे. परंतु भाजपकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. भाजपला राज्यपालांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलेलं आहे.

आधी आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी करणारे शिवसैनिक आता उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदासाठी जोर धरताना दिसत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे स्वतःच मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार का?, असा प्रश्न आता चर्चेत आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या