Uddhav Thackeray | गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. चौथ्या टप्प्याचं मतदान आता पार पडलं. आता पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी विरूद्ध महाविकास आघाडी यांच्यात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. आता पाचव्या टप्प्यात म्हणजेच राज्याच्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीला अधिक रंगत निर्माण झाली आहे. कारण पंतप्रधान हे मुंबईमध्ये रोडशो करून गेले.
दरम्यान आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावरून मोदींना टोला लगावला आहे. मोदी गायींवर बोलतात पण महागाईवर बोलत नाहीत?, असा सवाल त्यांनी मोदींना केला आहे.
महागाई हा लोकसभेचा महत्त्वाचा मुद्दा आहे. भाई और बहनो मतदानाला जाताना गॅस सिलिंडरला नमस्कार करून जा. आता तुमच्या फोटोला नमस्कार करून जायचं का? असा सवाल त्यांनी केला. गॅस के दाम उपर गये की निचे गये, डिझेल के दाम निचे गये की उपर गये. मोदीच म्हणायचे की ज्या देशाचे चलन पडतं त्या देशाची अब्रू जाते. आता चलन पडलं तर नमस्कार कोणाला करायचा? मोदींनाच नमस्कार करायला हवा, असं म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोदींना सुनावलं आहे.
“आम्हाला शेंडी जानव्याचे हिंदुत्व नकोय”
तुम्ही दोघांचं हिंदुत्व कसं वेगळं ठरवू शकता. प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार हे बाळासाहेबांनी पुढे नेले. तेच विचार मी आणि आदित्य पुढे आणण्याचं काम करत आहे. शेंडी, जानव्याचे हिंदुत्व नकोय. देवळात घंटा बडवणारं हिंदुत्व नकोय, असं प्रबोधनकार म्हणायचे आणि आम्ही तेच करतोय. बदल आमच्यात नाहीतर भाजपच्या वृत्तीत बदल झाला असल्याचं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले आहेत.
“मोदी मणिपूरमध्ये का जात नाहीत”?
मोदींनी दहा वर्षांच्या कामावर बोलावं. पीक विमा, हमी भाव का मिळत नाही, मोदी मणिपूरला का जात नाहीत? शौर्य आहे तर मणिपूरला जाण्यापासून शेपट्या का घातल्या आहेत. चीनने जमीन बळकावली आहे. काश्मीरमध्ये तणाव आहे. 370 सोडलं तर आदाणीने जमीन घेतली आहे. त्यावर का कोणी बोलत नाही? असा तिखट सवाल त्यांनी केला आहे.
मोदींनी अच्छे दिन आणले नाहीत, महागाई आणली नाही, 15 लाख आले…नाही मग खोटं बोलत आहात ते लोकांना कळतंय ना. बाळासाहेबांच्या खोलीत दिलेला शब्द हा जुमला होता. मी शिवाजी पार्कवर शपथ घेतली. मी खोटं बोलत नाही, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.
News Title – Uddhav Thackeray On Pm Modi And BJP About inflation
महत्त्वाच्या बातम्या
अजित पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर!
“नकली राष्ट्रवादी, शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार”; मोदींच्या दाव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया
महिलांनो बाहेर पडताना बॅगमध्ये ‘या’ 5 गोष्टी ठेवाच; अन्यथा होईल मोठी पंचाईत
अधिक मीठ खाणं जीवघेणं ठरतंय, जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा