Loading...

राममंदिरासाठी अडवाणींचं मोठं योगदान; लवकरच मी त्यांची भेट घेणार- उद्धव ठाकरे

मुंबई | राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. त्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचं राममंदिरासाठी मोठं योगदान आहे, म्हणून मी त्यांची लवकरच भेट घेणार आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

अयोध्या निकाल लागल्यानंतर उद्धव यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केल्या. तसंच आज बाळासाहेबांची आठवण येणं साहजिकच आहे, असंही ते म्हणाले.

Loading...

मी येत्या दोन ते तीन दिवसांत शिवनेरीला जाणार आहे तसंच 24 तारखेला अयोध्येला जाणार आहे, असंही उद्धव यांनी सांगितलं आहे.

आजच्या निकालाचा आनंद व्यक्त करत असताना मी शिवसैनिकांना सूचना दिल्या आहेत. आनंद जरूर व्यक्त करा पण तो व्यक्त करत असताना कुठंही कुणाला त्रास होईल असं वागू नका, असंही उद्धव म्हणाले आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

Loading...