Top News महाराष्ट्र मुंबई

मंदिरासाठी कुणी काय केलंय हे आम्हाला माहितीये, जेव्हा वेळ आली होती…., उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

मुंबई |  अडीज तीन महिन्यांच्या प्रदीर्घ लॉकडाऊननंतर मिशन बिगीन अगेनच्या अंतर्गत आता जनजीवन पूर्वपदावर येण्यास हळूहळू सुरूवात झाली आहे. अशातच ५ तारखेपासून राज्यातील मंदिर देखील उघडण्याची मागणी भाजपने केली आहे. यावर जे जनतेच्या हिताचं तेच मी करणार, अशा मुद्द्यावर घाणेरडे राजकारण नको, अशी रोखठोक भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.

उद्धव ठाकरे यांनी एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन’ या कार्यक्रमात बोलताना भाजपला जोरदार चिमटे काढले.  मंदिरासाठी कुणी काय केलंय हे आम्हाला माहितीये, जेव्हा वेळ आली होती तेव्हा शिवसेनाच पुढे आली, बाकीचे सगळे गप्प होते, असा टोला त्यांनी लगावला.

उद्धव ठाकरे म्हणाले, “५ तारखेला महाराष्ट्रातली मंदिरं सुरू करण्याची भाजपची मागणी आहे पण जे जनतेच्या हिताचं तेच मी करणार, अशा मुद्द्यावर घाणेरडे राजकारण नको. मंदिरासाठी कुणी काय केलं हे माहिती. जेव्हा वेळ आली तेव्हा हे गप्प बसले होते, शिवसेनाच पुढे आली. तेव्हा लॉकडाऊन असल्यासारखे गप्प होते”

कोरोनाच्या काळात महाराष्ट्र सरकारने अतिशय व्यवस्थितपणे आणि संयतपणे कारभार हाताळला आहे. लॉकडाऊन हा दीर्घकालीन पर्याय होऊ शकत नाही. जनतेची साथ देखील या लढ्यात फार महत्त्वाची बनली आहे, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोनानं ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांच्या छातीत झालीय बुरशी; कोरोनाचं धक्कादायक वास्तव!

देशात कोरोनाचा हाहाकार, कालच्या दिवसातली धक्कादायक आकडेवारी….

“माझ्याबद्दल फार वाईट गोष्टी बोलल्या जात आहेत” रिया चक्रवर्तीचा भावुक व्हिडीओ व्हायरल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या