बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सामनातील भाषा बाळासाहेबांकडून आलेली, भाषा आणि दिशा कधी बदलणार नाही”

मुंबई | शिवसेना पक्षाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या संपादकीय विभागाची जबाबदारी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडेच आहे. ‘सामना’तील भाषा ही बाळासाहेबांकडूल आलेली आहे. आमची पितृभाषा आहे. त्यामुळे ‘सामना’ची भाषा आणि दिशा बदलणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

प्रभू श्रीराम यांचं दर्शन घेण्यासाठी येत्या सात मार्चला अयोध्येला जाणार आहे. ज्यांना शक्य आहे, त्यांनी यावं. मात्र देवदर्शनात राजकारण नको, असं आवाहन ठाकरेंनी केलं आहे. विधानभवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मराठा आरक्षणावर सरकार न्यायालयात ताकदीने लढत आहे. मुस्लिम आरक्षणावरुन आदळआपट करु नका, मुद्दा समोर आल्यावर भूमिका स्पष्ट करु, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सीएए आणि एनआरसीमुळे राज्यातील एकाही नागरिकाचं नागरिकत्व हिरावू देणार नाही. महाआघाडीच्या नेत्यांची समिती तयार करुन यावर भूमिका ठरवणार असल्याचंही ठाकरेंनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पवारांचा धसका घेऊन मोदींनी ‘तो’ निर्णय घेतला असावा; भाजप आमदाराची टोलेबाजी

विवाहबाह्य संबंध उघड झाल्यानं सुनेनं खोटे आरोप केले- विद्या चव्हाण

महत्वाच्या बातम्या-ी

भाजप नेता म्हणतो, 5 कोटी असतील तरच सभापतीसाठी लढा!

“मुस्लिम आरक्षणाबाबत महाविकास आघाडीत कोणताही निर्णय झाला नाही”

माझ्यासाठी पहिल्यांदा देश नंतर पक्ष; पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More