बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तुम्ही चिंता करु नका, शांत राहा; आमचं सगळं ठरलंय!

मुंबई | भाजपच्या नेत्यांनी काहीही वक्तव्यं करु द्या मात्र तुम्ही शांत राहा. जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केल्याचं कळतंय.

विधानसभा निवडणुकीचं जागावाटप ठरल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. त्यानंतर शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली होती.

भाजप नेते काही बोलले तरी तुम्ही चिंता करु नका. त्यावर काहीही वक्तव्ये करु नका, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी केल्याचं कळतंय.

दरम्यान, लोकसभेसाठी बोलणी करतानाच विधानसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अमित शहा यांच्यासोबत चर्चा करु ठरला आहे, अशी माहिती देखील त्यांनी आपल्या नेते आणि कार्यकर्त्यांना दिल्याचं कळतंय.

महत्वाच्या बातम्या

-धोनी झुकणार की आयसीसीचा निर्णय झुगारणार?

-११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन मृतदेह स्मशानभूमीत फेकला

-धक्कादायक! गेल्या ६ वर्षात ग्रामीण युवकांच्या बेरोजगारीत ३ पटींनी वाढ

-भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता विमानाची माहिती देणाऱ्यास बक्षिसाची घोषणा

-सांगलीत भाजप कार्यकर्त्यांची धारदार शस्त्राने वार करुन हत्या

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More