Uddhav Thackeray | राज्य विधिमंडळाचं पावसाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (27 जून) सुरू झालं आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. आज विरोधी नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यावरुनच सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.
विशेष म्हणजे आज संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उद्धव ठाकरेंचं केलेलं स्वागत चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विविध मुद्यांवरून टीका केली.
शेतकरी कर्जमाफी करा- उद्धव ठाकरे
“राज्यात रोज एक शेतकरी आत्महत्या करतोय. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की, राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. त्यांचं ठीक आहे, कारण त्यांची पंचतारांकीत शेती आहे. पण, राज्यात दररोज 9 शेतकरी आपलं आयुष्य संपवत आहेत, 10 हजार 22 कोटींची नुकसान भरपाई देणं बाकी आहे.”, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.
“नागपूर अधिवेशनात कोणीही न मागता मी 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ केलं होतं. अजूनही 3 महिने निवडणुकीला आहेत, तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. नुसत्या घोषणा करू नका त्याची अंमलबजावणी करा. शेतकऱ्यांवर बंदुक रोखली आहे, त्यांचा वाली कोण आहे?”, असा संतप्त सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारला केला.
Shivsena LIVE | प्रसारमाध्यमांशी संवाद | UddhavSaheb Thackeray | शिवालय, मुंबई ⬇️ https://t.co/xIY02YwUgc
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) June 27, 2024
“..तसंच लाडक्या भावालाही मदत करा”
पुढे त्यांनी पोलिस भरतीबाबतही भाष्य केलं. पोलिस भरतीत तरुणांना राहण्यास व्यवस्था नाही, सोई सुविधा नाही. जोगेश्वरीत पोलीस भरतीसाठी आलेली मुले ब्रीजखाली झोपत आहेत, लाडक्या बहिण योजनेचं स्वागत करतो. मात्र, लाडक्या भावालाही मदत करा. असं म्हणत त्यांनी (Uddhav Thackeray) पोलीस भरतीतील युवकांच्या प्रश्नांकडे लक्ष्य वेधलं.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी एक मोठी घोषणा देखील केली. आमचं सरकार आल्यास मुंबईत 50 टक्के मराठी माणसांना घरे देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.तसंच मराठी माणसांनी रक्त सांडून मुंबई मिळवली आहे, मुंबईत त्यांना घरं मिळालीच पाहिजेत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
News Title – Uddhav Thackeray on State Govt
महत्त्वाच्या बातम्या
स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मेगा भरती, पगारही मिळणार भरभक्कम; लगेच करा अर्ज
मोठी बातमी! चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला
HDFC बँकेने ग्राहकांना दिला झटका; ‘या’ सेवेत होतोय मोठा बदल
सतर्क राहा! हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा