Top News विधानसभा निवडणूक 2019

उदयनराजेंना भाजपत घेताना आम्हाला विचारलं होतं का?- उद्धव ठाकरे

मुंबई | काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेनेची भुमिका स्पष्ट केली. आणि शिवसेनेेचाच मुख्यमंत्री होईल असं त्यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं आहे.

भाजपने ज्या 124 जागा दिल्या त्या आम्ही स्विकारल्या. साताऱ्याची जागेविषयी मला विचारात घेतलं नाही. मला न विचारता उदयनराजेंचा भाजपत पक्षप्रवेश करून घेतला. म्हणून शिवसेनेला साताऱ्याची जागा सोडावी लागली, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी उदयनराजे भोसलेंच्या भाजपप्रवेशावर मत मांडलं. 

मला एका गोष्टीचं दुःख झालं की शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीय, शिवसेनाप्रमुखांचा परिवार, या परिवारावर म्हणजे माझ्यावर पहिल्याप्रथम कोणीतरी खोटारडेपणाचा आरोप केला आहे, असं म्हणत ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.

मी शिवसेनाप्रमुखांना शब्द दिलाय. एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री करेन. शिवसेनेचा मुख्यमंत्री आणल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्यासाठी मला अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांची गरज नाही. तो शब्द देताना मी कुणाची परवानगी घेतली नव्हती. तो शब्द मी पाळणारचं एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारचं!, असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल हे ठामपणे सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या