Uddhav Thackeray l राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र आता लवकरच मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे अॅक्शनमोडमध्ये असल्याचं दिसून येत आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे अॅक्शनमोडमध्ये :
राज्यात येत्या 3 महिन्यांत मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून मोर्चेबांधणीस सुरुवात देखील झाली आहे. अशातच उद्धव ठाकरेंकडून मुंबईसाठी खास नियोजन देखील करण्यात येत आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे 26, 27,28 आणि 29 डिसेंबरपर्यंत मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. मात्र या बैठका विधानसभा निहाय होणार आहेत. त्यामुळे या बैठकीमध्ये स्वतः उद्धव ठाकरे आढावा घेणार आहेत. दरम्यान, 21 डिसेंबर रोजी मुंबईतील निरीक्षकांची बैठक देखील पार पडली होती. मात्र त्यानंतर आता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येणार आहे.
Uddhav Thackeray l आगामी निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार का? :
मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मातोश्रीवर 4 दिवस उद्धव ठाकरे बैठका घेणार आहेत. या बैठकीत मुंबई महानगरपालिकेच्या तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरे हे शाखा भेटीचे आयोजन करणार आहेत. त्यामुळे त्यासंदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
तसेच आगामी मुंबई महानगरपालिका शिवसेना ठाकरे गटाने स्वबळावर लढवावी असं पदाधिकाऱ्यांच म्हणणं आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिका निवडणूक महाविकास आघाडी की स्वबळावर लढणार याकडे देखील राज्यच लक्ष लागलं आहे.
26 डिसेंबर : बोरिवली विधानसभा , मागाठाणे विधानसभा, दिंडोशी, दहिसर विधानसभा , चारकोप, कांदिवली आणि मालाड विधानसभा
27 डिसेंबर : अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, कलिना विधानसभा
28 डिसेंबर : मुलुंड, भांडुप, मानखुर्द – शिवाजीनगर, विक्रोळी, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, अनुशक्तीनगर, सायन कोळीवाडा, चेंबूर.
News Title – Uddhav Thackeray Plan To BMC Election
महत्त्वाच्या बातम्या-
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता!
‘कोणत्या दुनियेत आहात धनूभाऊ?, काही सिरीयसनेस…’, सरपंच हत्येवर आमदार धस संतापले
ट्रायने मोबाईल रिचार्ज संदर्भात घेतला सर्वात मोठा निर्णय!
गुड न्यूज! लाडक्या बहीणींनो आजपासून खात्यात जमा होणार पैसे, 1500 की 2100 मिळणार?
प्रसिद्ध गायकाच्या बिल्डिंगला भीषण आग, मोठी जीवितहानी…