Ramdas Kadam | राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दिलेल्या एका स्फोटक मुलाखतीत थेट असा दावा केला आहे की, उद्धव ठाकरेंनीच (Uddhav Thackeray) राज ठाकरेंच्या घातपाताचा प्लॅन केला होता. ठाकरे बंधूंमध्ये एकीच्या हालचाली सुरू असतानाच हा गौप्यस्फोट झाल्याने नव्या चर्चांना तोंड फुटलं आहे.
कदम यांनी म्हटले की, “कणकवलीला जाताना आम्हाला रस्ता बदलावा लागला. एसपीने मुंबईत परतण्यास सांगितलं. हे सगळं राज ठाकरेंना विचारा. यामागे कोणाचा हात होता, हे स्पष्ट आहे. उद्धव ठाकरेंनीच हा डाव रचला होता,” असा थेट आरोप त्यांनी केला आहे.
‘उद्धव ठाकरेंवर विश्वास नाही, फक्त वापरून टाकतात’ – कदम :
शिवसेना-मनसे युतीच्या पार्श्वभूमीवर बोलताना रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. “राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेला निवडून दिलं, पण उद्धव ठाकरेंनी याचं पथ्य पाळलं का? मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला निमंत्रण दिलं पण व्यासपीठावर बसायला जागा दिली नाही,” असं सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या व्यवहारातील दुटप्पीपणावर प्रकाश टाकला.
“राज ठाकरेंच्या (RajThackeray) डोळ्यात मी अश्रू पाहिले आहेत. मातोश्रीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले होते,” असा भावनिक दावाही त्यांनी केला.
Ramdas Kadam | ‘राजकीय एकीच्या नावाखाली फसवणूक’ :
रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी पुढे स्पष्ट केलं की, “शिवसेना-मनसे एकत्र आली तर राज ठाकरेंचा राजकीय बळी जाईल. उद्धव ठाकरेंनी यापूर्वीही मनसेचे नगरसेवक फोडले, राज यांच्या मुलावर दबाव आणला. मग आता एकत्र येण्यामागे नेमका हेतू काय?”
त्यांनी ‘एक म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत’ हे उद्धव ठाकरेंचं जुने विधान आठवून दिलं आणि विचारलं की, “आज तेच उद्धव ठाकरे मनसेला सामावून घेण्याचा दिखावा का करत आहेत?”
शरद पवारांचा उल्लेख, ‘भिकेचा कटोरा’ विधानही गाजलं :
कदम यांनी उद्धव ठाकरेंच्या राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत, “ते काँग्रेस आणि शरद पवारांना (Sharad Pawar) सोडणार आहेत का?” असा सवाल उपस्थित केला. “ते आज भिकेचा कटोरा घेऊन फिरत आहेत. महापालिका निवडणुकांनंतर मनसेचा वापर करून फेकून देतील,” असा गंभीर इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, “मी, दिवाकर रावते, लीलाधर ढाके आम्हा सगळ्यांना उद्धव ठाकरेंनी वापरून टाकले आहे. तसेच आमदारकी, मंत्रिपद काढून घेतले. नंतर स्वतः आणि मुलगा मंत्रिमंडळात आले,” असा आरोप करीत कदम यांनी ठाकरे गटातल्या अंतर्गत राजकारणाचीही पोलखोल केली.