Top News महाराष्ट्र मुंबई

“लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाला हे माझं एकट्याचं नाही तर तुम्हा सर्वांचं यश”

मुंबई |  आयएनएस आणि सी-व्होटर्सने लोकप्रिय मुख्यमंत्र्यांबाबत एक देशपातळीवर सर्व्हे केला. या लोकप्रिय 5 मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यावर भाष्य करताना लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाला हे माझं एकट्याचं नाही तर तुम्हा सर्वांचं यश, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

लोकप्रिय मुख्यंंत्र्यांच्या यादीत माझा समावेश झाला हे माझं एकट्याचं यश नाही. सहा महिन्यांच्या काळात शिवरायांचं हे राज्य पुढं नेण्यासाठी मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचं हे यश आहे. मुख्यमंत्रीपद हे फक्त निमित्त आहे महाराष्ट्र राज्याची सेवा घडते आहे हे महत्त्वाचं. लोकप्रिययतेत माझा वरचा नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र जगभरात पहिलं राज्य कसं करता येईल हे माझं ध्येय असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

महाारष्ट्राच्या जनतेने संकटकाळात विश्वास दाखवला. तसंच माझ्या मंत्रिमंडळाने आणि अधिकाऱ्यांचे देखील… त्याबद्दल त्यांच्या सर्वांचे आभार अर्थात तमाम शिवसैनिकांचे प्रेम व शिवसेनाप्रमुख आणि मॉंसाहेबांच्या आशीर्वादशिवाय ही झेप घेणं शक्य नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

दुसरीकडे उद्धव ठाकरेंचा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्याने मंत्रिमंडळातील त्यांच्या सहकाऱ्यांना देखील आनंद झाला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आनंदी होत उद्धव ठाकरे यांचा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमधील समावेश हा आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं म्हटलं आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

कडक मुख्यमंत्री धडक निर्णय; आंध्रात टॅक्सीचालकांना मिळणार प्रत्येकी 10 हजार रुपये!

नुकसान भरपाई देताना नागरिकांना विश्वासात घ्या; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

महत्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनमधील काही निर्बंध केले शिथील तर नव्या उपक्रमांना दिली संमती!

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा ‘या’ तारखेपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी!

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट; भेटीनंतर परीक्षांबाबत केला मोठा निर्णय जाहीर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या