Top News विधानसभा निवडणूक 2019

आता पालखीचे भोई व्हायचं नाही तर शिवसैनिक पालखीत बसवायचा- उद्धव ठाकरे

मुंबई | महाराष्ट्रात आता आपलचं सरकार येणार आहे. आता पालखीचे भोई व्हायचं नाही तर शिवसैनिक पालखीत बसवायचा आणि तो मी कोणत्याही परिस्थितीत बसवणारच, अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

शिवसेना अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम आहे. परंतु भाजपकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. भाजपला राज्यपालांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलेलं आहे.

काँग्रेसच्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याची चर्चा झाल्याची माहिती आहे.  त्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी उद्धव ठाकरे कामाला लागल्याचं दिसून येत आहे. उद्धव ठाकरे मातोश्रीवरून शिवसेना आमदारांची भेट घेण्यासाठी मढच्या रिट्रीट हॉटेलकडे रवाना झाले आहेत. यावेळेस त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या.

आधी आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी करणारे शिवसैनिक आता उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदासाठी जोर धरताना दिसत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे स्वतःच मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार का?, असा प्रश्न आता चर्चेला जाऊ लागला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या