लोकसभेच्या निकालाआधी उद्धव ठाकरेंना पहिला मोठा धक्का!

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निवडणुकीदिवशीच पत्रकार परिषद घेतल्याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाईचे आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निवडणुकीदिवशी पत्रकार परिषद घेतली आणि आचारसंहितेचा भंग केला असा आरोप भाजपने केला आहे. यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर कारवाईचे आदेश दिले.

उद्धव ठाकरेंना धक्का

भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर योग्य ती कारवाई व्हावी असे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीला जिथं अधिक मतदान मिळणार होतं अशा ठिकाणी मतदानासाठी वेळ लावला जात होता असा दावा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. याचपार्श्वभूमीवर भाजपच्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. या पत्रात राज्य निवडणूक आयोगाला त्यादिवशी पत्रकार परिषदेत काय झालं याची माहिती पाठवली होती. यावर निवडणूक आयोगाने ती माहिती मिळवली आणि इंग्रजीत भाषांतर केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने तक्रारीची दखल घेत योग्य ती कारवाई केली.

उद्धव ठाकरे यांच्याविरोधात फौजीदार गुन्हा देखील नोंदवण्याची शक्यता आहे. तसेच राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून या विषयी निर्णय घेण्यात येईल. त्यांच्याविरोधात खटला देखील दाखल होण्याची शक्यता आहे.

शेवटच्या 48 तासात कोड ऑफ कंडक्ट लागतो म्हणजेच ज्या वेळी प्रचार संपतो आणि प्रत्यक्षात मतदान संपल्यानंतर एक तासाचा जो काळ असतो त्याकाळात कोणीही प्रचार करायचा नसतो. प्रतिक्रिया दिली तरीही त्यामध्ये मतदारांना मतदानाला येण्याचं आवाहन करता येते. मात्र पक्षावर, व्यक्तीवर थेटपणे आरोप करता येत नाहीत.

पत्रकार परिषदेत काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

मुंबईचे मतदान गाजले ते त्याच्या भोंगळ कारभारामुळे सामान्य जनता, विरोधी पक्ष, कलाकार सगळ्यांनी टीका केली. मुंबईतून मतदारसंघातील संत गतीने मतदान झाल्याच्या तसेच रांगेत अनेक तास ताटकळत उभे राहूनही अनेकजण मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहिल्याच्या तक्रारी समोर आल्या. यावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेत भाजपवर हल्लाबोल केला.

निवडणूक आयोग हा भाजपचा घरगडी आहे. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत आहे. तसेच मतदान केंद्रावर जाणूनबूजून अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा केला जातो. मतदारांनी मतदानाला उतरवू नये त्यांनी बाहेरच्या रांगा पाहून कंटाळून परत जावं यासाठी सरकारचा डाव आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

News Title – Uddhav Thackeray Press Conference On Mumbai Election Day Action From Central Election Commission

महत्त्वाच्या बातम्या

ऐश्वर्याच्या ‘या’ सवयीचा श्वेता बच्चनला येतो राग; सर्वांसमोर केला खुलासा

कोल्हापूरातील भयंकर अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर, कारने चौघांना उडवलं

टीम इंडियाला धक्का; ‘या’ स्टार क्रिकेटपटूने घेतली तडकाफडकी निवृत्ती

राज्यातील ‘या’ भागात पाऊस कोसळण्याचा अंदाज, महत्त्वाची अपडेट समोर

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान नताशाने उचललं मोठं पाऊल!