Top News

शिवसेनेत चाललंय काय??? उद्धव ठाकरेंचे आदेश झुगारुन 6 आमदारांची बैठकीला दांडी?

पुणे | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील खासदार आणि आमदारांची बैठक आयोजित केली होती. मात्र या बैठकीकडे शिवसेनेच्या 6 आमदारांनी पाठ फिरवल्याचं कळतंय. 

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी ही बैठक बोलवली होती. स्वत: उद्धव ठाकरेंनी संपर्क प्रमुखांना यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. मात्र तरीही शिवसेनेच्या या 6 आमदारांनीच बैठकीला गैरहजेरी लावल्याच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात एकही मंत्रिपद नसल्यामुळे या आमदारांनी बैठकीला उपस्थित राहणं टाळल्याचं कळतंय. शिवसेनेसाठी ही मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-एखाद्या मालिकेमुळे माझ्या वडिलांची राष्ट्रभक्ती कमी होत नाही- राहुल गांधी

-ट्विटरवर ‘स्वच्छता अभियान’; नरेंद्र मोदींना सर्वात मोठा फटका

-आघाडीचं सरकार चालवताना मी विष पचवतोय; मुख्यमंत्र्यांना अश्रू अनावर

-राजू शेट्टींच्या आंदोलनाचा दणका; लिटरमागे 3 रूपये दरवाढ देण्याचा दूध संघांचा निर्णय!

-5 जणांच्या मृत्यूला रस्ता दोषी कसा?; चंद्रकांत पाटलांचा संतापजनक सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या