महाराष्ट्र रायगड

“मृत व्यक्तीची संपत्ती नावावर करण्यासाठी उद्धव ठाकरेंचा ग्रामपंचायतीवर दबाव”

रायगड | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृत व्यक्तीची संपत्ती स्वत:च्या नावे करण्यासाठी ग्रामपंचायतीवर दबाव आणला होता, असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

ही मृत व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अन्वय नाईक आहेत, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. आज किरीट सोमय्या यांनी रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात जाऊन ग्रामपंचायतीला भेट दिली. त्यानंतर त्यांनी हा आरोप केलाय.

मृत अन्वय नाईक यांच्या मालकीच्या 19 मालमत्ता 5 कोटी 29 लाख किंमतीच्या मालमत्ता ग्रामपंचायतीने ठाकरे कुटुंबाच्या नावे कशा प्रकारे केल्या हे पाहून मान शरमेने खाली जातं. 2014 मध्ये अन्वय नाईक यांच्याकडून ठाकरे परिवाराने करार केला होता. नाईक यांच्या मृत्यूनंतर ठाकरे परिवाराने ही जमीन स्वत:च्या नावे करून घेतली. हे सर्व व्यवहार आम्ही कोर्टात उघड करू, असं सोमय्या यांनी सांगितलं.

सोमय्या यांच्या आरोपावर कोर्लई ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी खुलासा केला आहे. नाईक यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारस अज्ञा नाईक आणि वर्षा नाईक यांनी 2018मध्ये एक पत्रं सादर करून ही जमीन विकण्यास हरकत नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या नावावर ही जमीन करण्यात आली, असं मिसाळ यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

“आता जनाबसेनेने उगाच मिशांना पीळ देऊ नये, जनतेला तुमची लायकी कळली”

‘आई-बहिणीवरून शिवीगाळ करणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्याचं निलंबन करा’; मनसे आक्रमक

‘त्या’ ट्विटची शहानिशा करूनच त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करेन- अजित पवार

“थोरातांनी बाबर खानदानावर असलेली काँग्रेसची वादातीत निष्ठा सिद्ध केली”

‘तुम्ही मर्द असाल तर…’; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या