मुंबई | सिंधुदुर्गात कणकवलीतील शिवसेनापुरस्कृत उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी जाणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणकवलीत सभा न घेण्याचा मुद्दा फेटाळून लावल्यानंतर उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला आहे.
कणकवली विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहे. त्यामुळे भाजपने नितेश राणे यांना तेथून उमेदवारी दिलेली आहे. मात्र, शिवसेनेने यावर नाराजी व्यक्त केली असून कणकवलीतून सतीश सावंत यांना उभे केले आहे.
कणकवलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभा घेणार नाहीत, असं सुभाष देसाई यांनी सांगितलं होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंही कणकवलीत सभा घेणार असल्याचे म्हटलं आहे.
दरम्यान, कणकवली मतदारसंघात शिवसेना-भाजप आमने सामने आल्याचे चित्र आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे कणकवलीच्या सभेत काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आदित्य ठाकरेंचा उदयनराजेंना वाकून नमस्कार; राजेंनी दिलं अलिंगन https://t.co/nctMXmG8dU @AUThackeray
— थोडक्यात (@thodkyaat) October 12, 2019
अभिनेत्री अमीषा पटेलविरोधात कोर्टाचं अटक वॉरंट https://t.co/S0ilWLJdYr @amisha34
— थोडक्यात (@thodkyaat) October 12, 2019
आदित्य नको तुम्हीच मुख्यमंत्री व्हा!; आठवलेंचा उद्धव ठाकरेंना सल्ला https://t.co/4JaZutP7lL @AUThackeray @uddhavthackeray @ShivSena @RamdasAthawale #assemblyelection2019
— थोडक्यात (@thodkyaat) October 12, 2019
Comments are closed.