Top News विधानसभा निवडणूक 2019

सरकारची कर्जमाफी मला पटलेली नाही- उद्धव ठाकरे

Loading...

परभणी | आम्ही यावेळी युती केली नसती तर सरकार अस्थिर राहिलं असतं म्हणून युती करावी लागली. सरकारची कर्जमाफी मला पटलेली नाही. आता सरकार येऊ द्या मला शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचं आहे, असं आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

पीक विमा योजन्याचा प्रश्न गंभीर झाला होता. विमा कंपनीचे दलाल पैसे द्यायला येतात मात्र पैसे देत नाहीत. पण शिवसेनेने त्यांना जागेवर आणलं आहे. शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी 1100 कोटी रुपये द्यायला त्यांना शिवसेनेने भाग पाडलं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Loading...

शिवसेनेचे गंगखेड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारार्थ प्रचारसभेत ते बोलत होते. पालम येथे जाहीर सभा पार पडली त्यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

दरम्यान, रासप उमेदवार रत्नाकर गुट्टे यांनी केलेल्या बंडखोरीबाबत बोलताना उद्धव ठाकरेंनी गुट्टेंवर तोफ डागली आणि त्यांना उमेदवारी देणाऱ्या रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना चांगलेच खडसावले आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या- 

 

 

Loading...

 

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या