“उद्या RSS लाही नकली म्हणतील”; उद्धव ठाकरे कडाडले

Uddhav Thackeray | आज 18 मे रोजी मुंबईत इंडिया आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जेपी नड्डा यांनी भाजपला आता संघाची गरज नसल्याचं वक्तव्य केलं. याला उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ज्यांनी राजकीय जन्म दिला त्या संघालाही भाजप नष्ट करून टाकेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“जेपी नड्डा यांनी यापूर्वी देशात एकच पक्ष राहील, असं म्हटलं होतं. मी कालच म्हटलंय हे आम्हाला नकली सेना म्हणतातय, उद्या आरएसएसलासुद्धा नकली संघ म्हणतील. योगायोगाने नड्डांची ही मुलाखत समोर आलीये.”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. “नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना भटकटी आत्मा म्हटलं. पण, त्यांनी अगोदर ते स्वतः कुठे आहेत ते ठरवावं. “, असा टोला यावेळी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)मोदींना लगावला.

भाजप काहीही म्हणू दे, भाजप आणि नरेंद्र मोदी म्हणजे ब्रह्मदेव नाहीत अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी कडाडून टीका केली. मोदी लाट आज कुठेही नाही. निवडणूक आता अंतिम टप्प्यात आल्यावर ते पंतप्रधान पदाचा चेहरा बदलू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे हरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

जेपी नड्डा काय म्हणाले होते?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काल एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोठं वक्तव्य केलं होतं. भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची. मात्र, आता आमचा पक्ष सक्षम आहे, असं जे. पी. नड्डा म्हणाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था आहे, तर भाजप हा राजकीय पक्ष आहे, असेही नड्डा म्हणाले. यावरच आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली.

News Title –  Uddhav Thackeray reacts to JP Nadda statement on RSS

महत्त्वाच्या बातम्या-

पीएफ खात्यातून तुम्ही कोणत्या कामासाठी किती पैसे काढू शकता?

‘प्रत्येक वेळेला हे बोहल्यावर चढतात’; उद्धव ठाकरेंनी मोदींना सुनावलं

गरोदरपणात महिलांचा आहार कसा असावा, जाणून घ्या ICMR ची मार्गदर्शक तत्त्वे

घराचं स्वप्न महागलं; ‘या’ प्रमुख शहरांमध्ये घराच्या किंमतीत वाढ

‘तारक मेहता…’ मधील सोढी अखेर घरी परतला; एवढ्या दिवस कुठे होता?, धक्कादायक खुलासा समोर