‘जे मस्तीत वागतात त्यांची मस्ती…’; उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर

Uddhav Thackeray | लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी होणार आहे. पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे भाषणाची सुरूवात तमाम माझ्या हिंदु भगिनींनो आणि मातांनो करत नसल्याने त्यांनी हिंदुत्त्व सोडलं असल्याचं फडणवीस म्हणाले होते. त्यावर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची तोफ डागली.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंदुत्व सोडलं असल्याचं वक्त्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर आहे. मी हिंदुत्व नाही मी भाजपला सोडलं असल्याचं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले आहेत. ते विक्रोळीत आले असता त्यांनी सभेत बोलताना उपस्थितांना संबोधित करत फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

मी हिंदुत्व सोडलं नाही. मी भाजपला सोडलंय. मी माझ्या भाषणाची सुरूवात देशभक्त बांधवांनो अशी करतो. मी देशभक्त बांधवांनो म्हटलेलं चालत नाही का? तुमचा देशभक्त या शब्दावर आक्षेप आहे का? ज्या कुणाला देशभक्तवर आरोप आहे…मग ते फडणवीस का असेनात ते देशद्रोही आहेत. अशा लोकांना गेट आऊटच केलं पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

काल मोदी येऊन गेले. ते भरकटले गेले असून त्यांच्या मेंदूला क्षीण आला. भ्रमीष्टांसारखं बोलत आहे. मला नकली संतान म्हणत आहेत. काल तर त्यांनी कहर केला. काँग्रेसच्या जाहीरनाम्याला माओवादी जाहीरनामा म्हणाले. तुमचा जाहीरनामा हा खाऊवादी आहे. आमचं सरकार आल्यावर लुटारूंना तडीपार करणार आहोत. सुरतचे दोघेजण महाराष्ट्र लुटत आहेत. इधर से उधर से असे लोक मुसलमानांची भीती दाखवत आहेत. इधर से उधर से भाडे से आलेले लोकं ही भीती दाखवत आहेत. त्यांच्यामुळे उत्तर भारतीय आणि जैनांचं काय होणार आहे?, असा सवाल त्यांनी केला आहे.

गुजरात पाकीस्तानमध्ये आहे का?

गुजरात पाकीस्तानमध्ये आहे का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सुनावलं आहे. गुजरात हे आमच्या भारतातील राज्य आहे. पण आमच्या महाराष्ट्रातील मुंबईमधील जे ओरबाडून तुम्ही गुजरातला नेत आहात त्याला आमचा विरोध असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

माझा महाराष्ट्र शाहू, फुले आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. तो काय आफगाणिस्तानात आहे काय? शाहू फुले आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र मोदी शाहांचा होऊ देणार नाही. जे मस्तीत वागतात त्यांची मस्ती कशी जिरवता येईल हे आमच्या मर्द शिवसैनिकांना माहीत आहे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

News Title – Uddhav Thackeray Replied To Devendra Fadanvis About Hindutva

महत्त्वाच्या बातम्या

फुलांच्या माळाने स्वागत केलं नंतर थेट कानाखाली वाजवली; कॉँग्रेस नेत्याचा व्हिडिओ व्हायरल

‘आता फक्त पाडा म्हणालो, विधानसभेला तर…’; मनोज जरांगेंचा गंभीर इशारा

होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई!

‘मोदींवर गुन्हा दाखल करा’, संजय राऊतांचा गंभीर आरोप

मलायका अरोराने भाड्याने दिला तिचा फ्लॅट; महिन्याचं भाडं ऐकून थक्क व्हाल