मुंबई | एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणीला हिरवा कंदील दाखवल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून महाविकास आघाडी सरकार आता कोसळलं आहे. उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं.
मुख्यमंत्रीपदासोबत उद्धव ठाकरेंनी विधानपरिषद सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे. थोडाच वेळात उद्धव ठाकरे राजभवनावर जाणार असून राज्यपालांना भेटून राजीनामा देणार आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर आता भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे आता भाजप सत्तास्थापनेचा दावा करू शकतं. महाराष्ट्राला आता भक्कम सरकार मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! बहुमत चाचणी होणार, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पत्रकारितेच्या अभ्यासक्रमांविषयी शनिवारी मार्गदर्शन सत्र, वाचा सविस्तर
सर्वात मोठी बातमी! औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर
‘…तोपर्यंत फ्लोअर टेस्ट होऊ नये’, शिवसेनेचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद
बहुमत चाचणीचा फैसला आज होणार, राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेना न्यायालयात
Comments are closed.