औरंगाबाद | शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील कृष्णा डोणगांवकर आणि त्यांची पत्नी देवयानी कृष्णा डोणगांवकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
कृष्णा यांच्या पत्नी देवयानी डोणगांवकर यांना लासूरमधून उमेदवारी देण्याच्या शब्दावर त्यांनी शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश घेतला होता. पण आपल्याच पक्षाविरोधी कारवाया केल्यानं उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्षातून दोघांची हकालपट्टी करण्यात आली असल्याचं समजत आहे.
कृष्णा डोणगांवकर हेे काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार साहेबराव पाटील डोणगांवकर यांचे चिरंजीव आहेत. जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर आल्यावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला होता. त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला होता.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सरचिटणीस असूनही माझ्याकडे कोणीही लक्ष देत नाही. मला पक्षात डावललं जात असल्याचा आरोप करत डोणगांवकर यांनी पक्षाला रामराम ठोकला होता.
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलीय आग; भारतीय कुटुंब लोकांना मोफत खाऊ घालतंय कढी-भात https://t.co/C3YgWGiwLs #AustralianBushfire #australiafire #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 5, 2020
खातेवाटपानंतर बच्चू कडूंनी सांगितलं ‘हे’ टार्गेट!- https://t.co/8HhNLVD0W3 @RealBacchuKadu
— थोडक्यात (@thodkyaat) January 5, 2020
मी चांगलं काम करेन, सर्वांना सोबत घेऊन काम करेन- आदित्य ठाकरे https://t.co/bCFIBromGR @AUThackeray @ShivSena @OfficeofUT @uddhavthackeray #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 5, 2020
Comments are closed.