Top News विधानसभा निवडणूक 2019

शिवसेना ही शेतकऱ्यांची शेवटची आशा आहे- उद्धव ठाकरे

मुंबई | शेतकरी संकटात सापडला आहे. पीक वाया गेल्याने शेतकरी रडत आहे. अशा वेळी सत्तेच्या खेळात मशगूल राहणे पाप आहे. शिवसेना ही शेतकऱ्यांची शेवटची आशा आहे.  अशा कठीण परिस्थितीतही मुख्यमंत्री शिवसेनेचाच व्हावा असं शेतकरी म्हणत आहेत, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

शेेतकरी अडचणीत असताना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांचा विश्वास सार्थ करायला हवा. प्रत्येक गावात शेतकरी मदत केंद्र सुरु करुन शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याकडे लक्ष द्या, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिले आहेत.

उद्धव ठाकरेंनी शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यभरात दौरा करुन ठाकरेंनी नुकसानी परिस्थितीचा आढावा घेतला.

पाऊस थांबण्याचं नाव घेत नाहीये. पाणी इतकं पडत आहे की शेताला शेततळ्याचं स्वरुप आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता रब्बीचे पीक घेता येणार नाही. शेतकऱ्यांची स्थिती पाहून मन गलबलतं, असंही ते म्हणाले आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या