Top News महाराष्ट्र मुंबई

मराठीचं वाकडं करण्याची हिंमत कुणातही नाही- उद्धव ठाकरे

Loading...

मुंबई | बाकीच्या भाषा जुन्या असतील, त्यांचा मी आदर करतो. पण मराठी भाषा टिकली पाहिजे. तसेच मराठीचं वाकडं करण्याची हिंमत कुणातही नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मराठी भाषा दिनानिमित्त विधानभवनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी वरील वक्तव्य केलं आहे. यावेळी कार्यक्रमात विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी एकाच मंचावर आल्याचे पाहायला मिळाले.

Loading...

प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान, स्वाभिमान असायला हवा. मराठी भाषा टिकवण्याचे काम आपल्या सर्वांचे आहे. नवं आपल्याला स्विकारायचं आहे पण मराठीला सोबत घेऊन आपण पुढे जाऊया, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

जिथं जिथं संकटं आली तिथं तिथं मराठी धावून आली. इंग्रजांना ठणकावून सांगणारी टिळकांची भाषा मराठीच होती. शाळेत गेल्याने मराठी येत नाही, संस्कारातून मराठी येते. मला मराठी भाषेसाठी कायदा करण्याचे भाग्य मला मिळाले आहे, असंही ते म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाच्या ‘संघ’ परिवाराचे योगदान काय?- शिवसेना

ही दडपशाही बघून हिटलरने सुद्धा शरमेने मान खाली घातली असती- जितेंद्र आव्हाड

महत्वाच्या बातम्या- 

आपला पॅटर्नच वेगळा; सलमान खान करणार ‘मुळशी पॅटर्न’चा रिमेक!

धक्कादायक! आप नेत्याच्या घरावर सापडले पेट्रोल बाॅम्ब, गावठी कट्टे, दगडांचा साठा

अजूनही मोदीबाबाची थोडी थोडी हवा आहे- सुशीलकुमार शिंदे

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या