निवडणूक आयोग भाजपची चाकरी करतंय काय?; उद्धव ठाकरे भडकले

Uddhav Thackeray | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (20 मे) पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. आज राज्यात शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडलं. या टप्प्यात काही मतदान केंद्रांवर निवडणूक प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून दिरंगाई केली जात असल्याचा आरोप ठाकरेंनी केला आहे.

यावेळी आदित्य ठाकरे, संजय राऊत यांची देखील उपस्थिती होती.उद्धव ठाकरे यांनी आज सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी निवडणूक आयोगासह राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

“..विरोधात आम्ही कोर्टात जाऊ”

“मतदान केंद्रावर काही ठिकाणी बोगस नावे घुसवली असल्याचं कळलं आहे. नावं वगळली जाणं हा तर त्यांचा आवडता खेळ आहे. पण त्यावर मी आता काही बोलणं योग्य नाही. सध्या जो उशीर केला जात आहे, तुमचं नाव काय, आयडी, तुमच्या भावाचं नाव काय, असं विचारुन विलंब लावला जातोय.”, असा आरोप यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.

पुढे ते म्हणाले की, “जिथे आम्हाला मतं पडत आहेत तिथेच हा विलंब केला जातोय. अशा मतदान केंद्र आणि त्यामध्ये असणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांची आणि प्रतिनिधींची नावे मी उद्या जाहीर करेन. तसेच त्याविरोधात आम्ही कोर्टात जाऊ”, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

“पहाटे पाच वाजले तरी मतदानाचा हक्क बजावा”

“हा मोदी सरकारचा जो डाव आहे की, तुम्ही मतदानाला उतरु नये, त्यांच्या विरोधातील मतदान कमी कसं होईल ते बघत आहेत. त्या डावाला बळी न पडता तुम्ही मतदान केंद्रामध्ये जावून उभे राहा.मतदान केल्याशिवाय मतदानकेंद्र बंद होत नाहीत. त्यामुळे पहाटे पाच वाजले तरी मतदानाचा हक्क बजावा.”, असं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केलं.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावरही संताप व्यक्त केला. “मला तर आता स्पष्ट दिसतंय की, हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खेळला जात असणारा अतिशय नीच घाणेरडा खेळ आहे. निवडणूक आयोग ही भाजपची चाकरी करतं की काय? असं म्हणायला जरुर वाव आहे.”, असा आरोप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. तर, आमदार रोहित पवार यांनी देखील अशीच शंका व्यक्त केली आहे.

मुंबईत मतदारांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या असून मतदानाला मुद्दाम उशीर केला जात असल्याचं लोक सांगतात. डोळ्यासमोर पराभव दिसत असल्याने लोकांना मतदानच करता येऊ नये याचा सापळा तर निवडणूक आयोगाला हाताशी धरून रचला नाही ना, अशी दाट शंका येते. पण ही निवडणूक लोकशाही आणि  संविधानाच्या अस्तित्वाची आहे. त्यामुळे आज एक दिवस कितीही त्रास झाला तरी तो सहन करून मतदारांनी कितीही उशीर झाला तरी मतदान करावं, ही विनंती!”, असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे. 

News Title-  Uddhav Thackeray Serious Allegations On Election Commission Of India

महत्वाच्या बातम्या-

संकट काळात ‘याच’ गोष्टी तुम्हाला अडचणीतून बाहेर काढतील!

“शाहरूख आणि करण जोहरचे माझ्या पतीसोबत होते समलैंगिक संबंध”, गायिकेचा धक्कादायक दावा

रूपाली चाकणकरांनंतर शांतिगिरी महाराजांनी ईव्हीएम कक्षाला घातला हार, गुन्हा दाखल

अभिनेत्री प्राजक्ता माळीने पहिल्यांदाच मुंबईमध्ये बजावला मतदानाचा अधिकार, म्हणाली…

“रात्री 11 वाजले तरीही चालेल पण मतदान करूनच जाणार,” जितेंद्र आव्हाडांच्या बालेकिल्ल्यात गोंधळ