Top News विधानसभा निवडणूक 2019

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं ही जनतेची इच्छा; संजय राऊतांचं सूचक वक्तव्य

मुंबई | काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सत्तास्थापन करण्याच्या तयारीत आहे. यातच महाशिवआघाडीत मुख्यमंत्री कोण असेल याबाबत अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं अशी जनतेची इच्छा आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

‘इंडियन एक्सप्रेस’नेही उद्धव ठाकरेच पाच वर्षासाठी मुख्यमंत्री होतील, अशी बातमी दिली आहे. त्यामुळे या शक्यतांना बळकटी मिळाली आहे. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंशिवाय ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांची नावं मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहेत. त्यामुळे महाशिवआघाडीचे सरकार राज्यात आल्यास मुख्यमंत्री कोण होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या