“चार दिवस काय चार वर्षे उद्धव ठाकरेंनी माझी चौकशी करावी, कारण…”
मुंबई | आयएनएस विक्रांत प्रकरणी अडचणीत सापडलेले भाजपचे नेते किरीट सोमय्यांची (Kirit Somaiya)आर्थिक गुन्हे विभागातर्फे चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी आता किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारला (Thackeray Sarkar) लक्ष करत प्रत्युत्तर दिलं आहे.
मी सगळ्या प्रकारच्या चौकशीला सामोरं जायला तयार आहे, कोर्टाने चार दिवस आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीला दिले आहेत, चार दिवस रोज तीन तास त्यांना हवी ती माहिती घेऊ शकतात. मला न्यायव्यवस्थेने सांगितले, पोलिसांना चौकशीमध्ये सहकार्य करा. मी न्यायदेवतेचा सन्मान करतो. ठाकरे सरकार सारखा अपमान करत नाही, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.
आमच्याकडे जी माहिती आहे ती जगाला माहिती आहे. जे काय आमच्याकडून हवे ते सगळी माहिती आम्ही देऊ, चार दिवस काय चार वर्षे उद्धव ठाकरे यांनी माझी चौकशी करावी, कारण पाप त्यांच्या पोटात आहे.
दरम्यान, ठाकरेंकडे काहीच पुरावे नाहीत, नुसती फेकाफेकी त्यांनी यासंदर्भात केलीये. त्यामुळे सोमय्या कुटुंबांनी कधीही पैसे ढापण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे सांगत सोमय्यांनी संजय राऊतांनी केलेल्या आरोपांंचं खंडन केलं आहे.
थो़डक्यात बातम्या –
“मुंबईत तुमची ताकद नाही, त्यामुळं तुम्ही कोणलातरी पकडून…”; संजय राऊतांचा हल्लाबोल
संजय राऊतांनी भाजपवर केलेल्या गंभीर आरोपाने राज्यात खळबळ
जो बायडन युक्रेनला जाणार?, ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर
“सिल्वर ओकवरील हल्ला हा माझ्या आईवर झालेला हल्ला”
मोठी बातमी! मुंबई महापालिकेचा नारायण राणेंना झटका
Comments are closed.