Uddhav Thackeray | आज पुण्यामध्ये शिवसेनेच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अहमद शहा अब्दालीचा राजकीय वंशज अमित शाह, असं म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी जोरदार प्रहार केला.
“इतिहासात आपण डोकावलं, तर शाहिस्तेखान जरा हुशार होता, असं म्हणावं लागेल.त्याची तीन बोटं कापली गेल्यानंतर तो पुन्हा महाराष्ट्रात आला नाही. त्यातील काही हुशारपण यांनी घेतलं असतं तर परत महाराष्ट्रात आले नसते.”, असं म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अप्रत्यक्षपणे अमित शाह यांच्यावर टीका केली.
“महाराष्ट्राने जे फटके दिले त्याचे वळ..”
“ते पुन्हा का आले?, जनतेच्या फटक्यांचे वळ कुणाकुणाच्या अंगावर उमटले. हे पाहण्यासाठी ते आले. अहमदशाह अब्दालीचा राजकीय वंशज हा पुण्यात आला होता. तो अहमद शाह होता आणि हे अमित शाह आहेत.अहमद शाहचा राजकीय वशंच इथे वळवळायला आला होता.”, अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
पुढे त्यांनी भाजपावर प्रहार केला. “नवाज शरीफचा केक खाणाऱ्यांकडून आता आम्ही हिंदुत्व शिकायला हवं का?, आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे विश्वासघातकी लोक हिंदू असू शकत नाही. तुम्ही आमच्याशी विश्वासघात केला.”, असं उद्धव
ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.
“चंद्राबाबू नायडू हिंदुत्ववादी आहेत काय?”
तसंच आम्ही जर कॉँग्रेससोबत युती करून हिंदुत्व सोडलं म्हणता मग ग तुमचे राजकीय बाप श्यामाप्रसाद मुखर्जी मुस्लीम लीगबरोबर मांडीला मांडी लावून का बसले होते?, मेहबुबा मुफ्ती यांच्याबरोबर सरकार का स्थापन केले?, आज या चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत आघाडी केली. ते काय हिंदुत्ववादी आहेत काय?, असे तिखट सवाल करत उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी जोरदार हल्लाबोल केला.
तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील उद्धव ठाकरे बरसले. “दोनच दिवसांअगोदर मी म्हणालो होतो की, एक तर तू राहशील किंवा मी राहिल. माझ्या पायाशी कलिंगड ठेवलेलं होतं. त्यामुळे काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. पण,मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही”,असं म्हणत नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
News Title – Uddhav Thackeray slam amit shah
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी ढेकणांच्या नादी लागत नाही’; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
EPFO मधील कोट्यवधी खातेधारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; आता PF…
“अमिताभ यांनी ऐश्वर्याला कधीच सून मानले नाही”; जया बच्चन यांचा मोठा खुलासा
दिपीकाने दिला बाळाला जन्म?; सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल
बच्चन कुटुंबात अजूनही कोल्ड वॉर सुरूच?, अमिताभ बच्चन यांच्या पोस्ट वेधलं लक्ष