बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काळी टोपी घालणाऱ्यांनो, सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्या- उद्धव ठाकरे

मुंबई | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना मानणाऱ्यांनी त्यांनी सांगितलेल्या हिंदुत्वाचा अर्थ समजून घ्यावा. नुसत्या काळ्या टोप्या घालू नका. त्याखाली डोकं असेल हिंदुत्व समजून घ्यावं, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केलीये.

भागवतांना मानणारे लोक असतील तर त्यांनी नुसती काळी टोपी घालू नये. त्या टोपीखाली डोकं असणाऱ्यांनी थोडा विचारही केला पाहिजे. हिंदुत्व समजून घेतलं पाहिजे. हिंदुत्वाबाबत काही लोक भ्रम पसरवित आहेत. हिंदुत्वाचा अर्थ पूजेशी जोडून संकुचित करत आहेत, असं भागवत म्हणाले. त्यामुळे भागवतांनी सांगितलेला हा अर्थ समजून घ्या, असा टोला उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपला नाव न घेता लगावलाय.

मला हिंदुत्वाबद्दल प्रश्न विचारले जात आहे. मंदिर उघडत नाही म्हणून मला हे प्रश्न विचारले जात आहेत. याद राखा, वाघाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर फटका मारणारच, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

बाबरी पडली तेव्हा कुठल्या बिळात शेपट्या घालून पडले होते? ज्यांचं नाव कुणालाही माहीत नव्हतं ते लोक मला हिंदुत्वाबाबत विचारत आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी कोश्यारींवर टीकास्त्र सोडलंय.

महत्वाच्या बातम्या-

“उद्धव ठाकरे आज दोन भूमिकांमध्ये, त्यामुळे भाषणासाठी कान आतूरलेले”

कोरोना आणि पेंग्विन महासरकार हे दोन व्हायरस…- अमृता फडणवीस

“आपल्याला मुंबईतून बाप-बेट्याचं सरकार हद्दपार करायचं आहे”

…तर माझी अवस्था देखील आडवाणी आणि वाजयपेयींसारखी झाली असती- एकनाथ खडसे

‘या’ अपेक्षेने मी सत्ताधारी पक्षात सामील झालो- एकनाथ खडसे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More