बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तुम्हाला विनंती करतो, कृपा करा जनतेच्या जीवाशी खेळ होईल असं राजकारण करु नका- उद्धव ठाकरे

मुंबई | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढताना दिसत आहे. याला पर्याय म्हणून राज्य सरकार लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत आहे. मात्र लॉकडाऊनला विरोधकांनी जोरदार विरोध करत लॉकडाऊन केलं तर रस्त्यावर उतरू असा इशारा दिला होता. यावरून उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

मी सर्व राजकारण्यांना विनंती करतो, कृपा करा जनतेच्या जीवाशी खेळ होईल असं राजकारण करु नका. सरकार जे पावलं उचलत आहे ते जनतेच्या हितासाठी उचलत आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.

मुख्यंमंत्री उद्धव ठाकरेंनी आज राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच लॉकडाऊनबाबतचा निर्णय दोन दिवसात घेणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. आज इशारा देतोय, पूर्ण लॉकडाऊनचा, दोन दिवसात दृश्य परिणाम दिसला नाही, किंवा दुसरा पर्याय मिळाला नाही, तर जगामध्ये जे सुरु आहे, पहिला लॉकडाऊन, दुसरा लॉकडाऊन होतोय.. त्यामुळे आता ठरवायला हवं, ही लाट मी रोखेनच पण पुढची लाट येऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

येत्या दोन तीन दिवसात मी पुन्हा बोलेन. मी तज्ज्ञांशी बोलेन, मला पर्याय सांगा, लॉकडाऊन पर्याय नाही मान्य, मग करायचं काय जरुर सांगा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

लाॅकडाऊन केलं तर रस्त्यावर उतरू म्हणणाऱ्या विरोधकांना उद्धव ठाकरेंनी झापलं, म्हणाले…

‘आज लॉकडाऊन जाहीर करत नाही, पण…’; उद्धव ठाकरेंचा जनतेला पुन्हा इशारा

मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेची संवाद ; वाचा संवादातील मुद्दे

अन् चक्क मुख्यमंत्र्यांच्या हेलिकाॅप्टरला मारावा लागला धक्का, पाहा व्हिडीओ

“दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा”

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More