महाराष्ट्र मुंबई

“मी शांत आहे, संयमी आहे, पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही”

मुंबई | मी शांत आहे, संयमी आहे. पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही आणि ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबीयांवर हल्ले सुरू झाले आहेत ही पद्धत निदान महाराष्ट्राची तरी नाही, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधलाय.

कुटुंबीयांवर येणार असाल, मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब आणि मुलंबाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना ठणकावलं आहे.

ईडी काय, सीबीआय काय त्यावर राज्याचा अधिकार नाही? आम्ही देतो ना नावं, आमच्याकडे आहेत नावं. मालमसाला तयार आहे. पूर्ण तयार आहे. पण सूडाने जायचं का? मग जनतेने आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायची. सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू, असा इशारा उद्धव ठाकरेंनी विरोधकांना दिलाय.

माझी आजही प्रामाणिक इच्छा आहे की, हे असं विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करू नका. कारण विकृती ही विकृती असते. त्या मार्गाने जायची आमची आज तरी इच्छा नाही. आम्हाला भाग पाडू नका, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

शरद पवारांवर बोलणाऱ्यांची लायकी काय आहे?- उद्धव ठाकरे

हिंदुत्व सोडायला ते का धोतर आहे?; मुख्यमंत्र्याचा राज्यपालांना टोला

…म्हणून मी स्वतः ड्रायव्हिंग करतो- उद्धव ठाकरे

तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू-उद्धव ठाकरे

भारतीय नौदलाचं MiG-29K प्रशिक्षण विमान अरबी समुद्रात कोसळलं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या