…तर तुम्ही दिल्लीच्या तख्तावर टेकू शकला असता का?- उद्धव ठाकरे
मुंबई | मराठी ही महाराष्ट्राची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे.छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर तुम्ही दिल्लीच्या तख्तावर टेकू शकत आहात, ते टेकू शकला असता? बसू शकत आहात, ते बसू शकला असतात? एवढं जरी कळलं, तरी अभिजातच काय, सर्वोत्तम सर्वोच्च दर्जा देण्यासाठी एवढी एकच गोष्ट पुरे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केली केली आहे.
विधीमंडळातील वि.स पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि मराठी भाषा विभाग, मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिसंवादाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
वर्षामागून वर्ष जात आहेत. अजून मराठी भाषेला अभिजात भाषेची मान्यता मिळत नाहीये. गेल्या वर्षी मी उद्वेगाने म्हटलं, जे दिल्लीत दर्जा देणारे किंवा नाकारणारे बसले आहेत, त्यांच्या लक्षात एक गोष्ट आणून द्यायला हवी किंवा अगदी खडसावून सांगितलं पाहिजे, ही आमची मातृभाषा आहे आणि आम्हाला तिचा अभिमान आहेच, असं मुख्यमंत्री म्हणाले.
इंग्रजी आली पाहिजी. आम्हाला दुसऱ्या भाषेचा दुसवास करायचा नाही. करायचा नाही पण त्यामुळे माझी भाषा कमकुवत होता कामा नये. याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
थोडक्यात बातम्या-
भारताच्या पराक्रमी लेकीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, ‘या’ पदावर नियुक्ती
मोठी बातमी! 10 आणि 12 च्या बोर्डाच्या परीक्षांचं नवं वेळापत्रक जाहीर
‘तुम्ही कोणाचीही तोंड चिपकवा मला….;’ चित्रा वाघ आक्रमक
“श्रीदेवीनंतर सातत्याने विनोदी भूमिका साकारणारी बॉलिवूडची मी दुसरी अभिनेत्री”
“माझी बहिण प्रीतम, पंकजा मुंडे यांच्यासोबतही फिरली ते फोटो का व्हायरल करत नाही”
Comments are closed.