बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वाटेल तितकं आपटा तुम्ही, वाटेल तितकं बोंबला तुम्हाला उत्तर देणार नाही”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अधिवेशनात बोलताना भाजपवर सडकून टीका केली आहे. ज्यावेळी महाराष्ट्रातील जनेतासाठी कोविड काळात उपाययोजना कराव्या लागल्या, सेवासुविधा देण्यासाठी आपण अर्थसंकलन सुरु केलं, तेव्हा मला थोडी लाज वाटते की त्यावेळी भाजपच्या आमदारांचा फंड महाराष्ट्रासाठी न येता दिल्लीकडे गेला. मुख्यमंत्री मदत निधी मला नको होतो, महाराष्ट्रासाठी हवा होता, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांना फटकारलं.

महाराष्ट्रात भाजप जी पोलखोल करत आहे ती पोलखोल नाहीच आहे. महाराष्ट्रात पोलला, निवडणुकीला वेळ आहे, पण केंद्र सरकारच्या पीएम केअर फंडचा हिशोब कोण मांडणार? कोण देणार? त्याचा हिशोब विचारायचा नाही का?, असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली.

एकतर कुणामध्ये प्रश्न विचारण्याची हिंमत नाही. जर विचारला तर देशद्रोही ठरवलं जातंय. काय ही परिस्थिती आली आहे की लोकांनाही आता कळायला लागलंय की प्रश्न विचारला की देशद्रोह. ही इथली लोकशाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडले.

दरम्यान, केंद्राचा फंड तुमच्या चौकशीच्या फेऱ्यात येत नाही. काय वाटेल तितकं आपटा तुम्ही, वाटेल तितकं बोंबला तुम्हाला उत्तर देणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

ठाकरे सरकारमधील मंत्रीच बेशिस्त, ते इतरांना काय शिस्त लावणार- पंकजा मुंडे

#उद्धव_माफी_माँगों ट्विटरवर हा हॅशटॅग का होतोय ट्रेंड? जाणून घ्या!

पुणेकरांनो सावधान! ‘कोरोना’ शहरात फोफावतोय, पाहा आजची आकडेवारी

विधानसभेत आज एक ‘कॉमेडी सम्राट’ पाहिला- नितेश राणे

“दारू पिऊन जीवे मारण्याच्या धमक्या देण्यातच बलात्काऱ्यांच्या समर्थकांचा पुरूषार्थ उरला आहे का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More