महाराष्ट्र सोलापूर

घोषणा देणारे गेले, आम्ही प्रत्यक्षात मदत करू- उद्धव ठाकरे

सोलापूर | सरकारकडून जे शक्य आहे ते करणार आहे, घोषणा देणारे गेले आम्ही प्रत्यक्षात काम करू, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला आहे.

परतीच्या पावसाचं संकट टळलं नाही, आणखी काही दिवस अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा हवामान खात्याने दिला आहे, त्यामुळे नुकसान किती होतेय याचा अंदाज आला आहे, सरकार लवकरच मदत करेल, अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

शेतकरी आणि आपत्तीग्रस्त हे संकटाच्या डोंगराखाली अडकलेले आहेत, त्या लोकांना दिलासा आणि धीर देण्यासाठी आम्ही इथं आलोय, सरकारकडून जे जे काही करणे आवश्यक आहे ते लोकांसाठी आम्ही करू, हे सरकार तुमचं आह, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

पुढच्या 24 तासात धुवांधार पाऊस होईल; हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

अतिवृष्टीमुळे गावाचा प्रमुख रस्ता वाहून गेला; चिखल-गाळ तुडवत फडणवीस नुकसानग्रस्तांच्या भेटीला

शरद पवार यांना ‘हे’ एकमेव काम उरलं आहे- देवेंद्र फडणवीस

एकनाथ खडसेंची भाजपने दखल घेतली नाही, त्यामुळे…- शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या