‘बिनडोक राज्यपाल चालणार नाही’; उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

मुंबई । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांनी तुलना मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत केली होती. त्यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यावरून राजकारणात वादाला तोंड फुटलं आहे.

अनेक मंत्र्यांनी तसेच विरोधी आमदार आणि नेते मंडळींनी त्यांच्या या वक्तव्यावर निषेध करत आंदोलनं केलं होती. मात्र खासदार उदयनराजे भोसले यांनी आज राज्यपालांच्या विरोधात जाऊन रायगडावर आक्रोश सभा घेतली. तर दुसरीकडे मुंबई येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.

उद्धव ठाकरे यांनी उदयनराजेंच्या भूमिकेचं स्वागत केलं. राज्यपाल नियुक्तीबद्दल यापुढे निकष ठरवले पाहिजे. कारण मी कुणीतरी झालो आणि राज्यपाल म्हणून मला पाठवलं तर ते चालणार नाही, असं ठाकरे म्हणाले. केवळ माझा माणूस आहे पण तो बिनडोक असला तरी चालेल पण राज्यपाल म्हणून पाठवतो हे चालणार नाही, असं म्हणत ठाकरेंनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली.

एवढंच नाहीतर भाजपमधील छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी नाराज असून ते एकत्र येत आहे. थोडा अवधी दिला होता, राज्यपाल बदलले जात असेल तर चांगलं आहे पण त्यांना पाठिंबा दिला जात आहे, असं त्यांनी सांगितलं.

अगदी आताच्या महाराष्ट्रातील गद्दारीची तुलना शिवरायांच्या आग्रा सुटकेसोबत केली जात असेल तर महाराष्ट्र काय आहे, तो दाखवून देण्याची वेळ आली आहे.

थोडक्यात बातम्या-

“…मग शरद पवारांच्या पण कपाळावर गद्दार लिहिलंय का?”

‘हे’ उपाय केल्यानं हिवाळ्यातही त्वचा दिसेल चमकदार

‘राजभवनाच्या बाहेर उभं राहून देता का शिव्या?’; संजय राऊतांचं शिंदे गटाला आव्हान

नवीन सिमकार्ड घेतल्यानंतर आता ‘हा’ नियम होणार लागू

काळजी घ्या! पुण्यातील ‘या’ परिसरात आढळला झिका व्हायरसचा रुग्ण