‘…नाहीतर काही लोक स्वत:साठी मागतात’; उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंना टोला
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजप नेते नारायण राणेंना सणसणीत टोला लगावला आहे.
बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक आहात. त्यामुळेच तुम्ही कोकणासाठी सरकारी मेडिकल कॉलेज मागितलं. नाही तर लोक स्वत:साठी मेडिकल कॉलेज मागतात, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर निशाणा साधला आहे.
आपल्या पक्षाचा प्रमुख राज्याचा मुख्यमंत्री आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपल्यासोबत आहे. आपली सत्ता असूनही तुम्ही काहीही मागणी करत नाही. तुम्ही रत्नागिरीसाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालय मागितलं. तुम्ही स्वत:साठी काही मागितलं असतं. पण तुम्ही ते केलं नाही. काही लोकं असतात, इकडे तिकडे काही करून स्वत:साठी काही तरी मागतात. तुम्ही मात्र कोकणासाठी सरकारी कॉलेज मागितलं. याचा मला अभिमान वाटतो, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मी कोणत्याही योजनांच्या केवळ घोषणा करणार नाही. ज्या गोष्टी करणं शक्य आहे त्याच घोषणा मी करेल. ज्या घोषणा करेल त्या पूर्णही करेल, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. तर त्यासोबतच त्यांनी वर्क फ्रॉम करण्याचंही आवाहन नागरिकांना केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
वडील आणि 84 वर्षीय आजोबांची हत्या करून तरूणाने उचललं धक्कादायक पाऊल!
चांगली खेळी करुनही पदरी निराशा, ‘सुंदर’चं शतक थोडक्यात हुकलं
केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोदी सरकारला पुन्हा दणका; दिले ‘हे’ आदेश
स्वॅब न देताच रुग्णाला दिला कोरोना पॉझिटिव्हचा अहवाल; ‘या’ जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
महाविकास आघाडीला दणका; मुंबई उच्च न्यायालयाने ‘ती’ फेरविचार याचिका फेटाळली
Comments are closed.