Top News

“भेदभाव करून सरकार चालवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे”

मुंबई | कोरोनाच्या काळात देशात किळसवाणं राजकारण सुरु आहे. मात्र एक दिवस असा येईल की लोक म्हणतील कुणीही चालेल पण हे नको, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलंय.

भेदभाव करून सरकार चालवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. कोरोना लस बिहारला फुकट मग आम्ही काय बांगलादेशला राहतो काय?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय.

घंटी वाजवा, थाळ्या बडवा हे आमचं हिंदुत्व नाही. अतिरेक्यांना बडवणारा हिंदु बाळासाहेबांना अपेक्षित होता. आम्हाला कुणी हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याकडून आम्ही हिंदुत्व शिकलेलो आहोत, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावलं.

जीएसटीच्या मुद्द्यावरुन देखील उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला सुनावलं. जर जीएसटीची प्रणाली अपयशी ठरली असेल तर पहिल्या करणप्रणाली नुसार अंमलबजावणी व्हावी, असं सांगतानाच पंतप्रधान मोदींनी याबद्दल माफी मागितली पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

काळी टोपी घालणाऱ्यांनो, सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्या- उद्धव ठाकरे

कुणी कितीही चिखलफेक केली तरी आमचं सरकार पाच वर्ष टिकणार, कारण…- संजय राऊ

“छाताडावर गोळ्या झेलून अतिरेक्यांना पकडणारे माझे पोलीस, मला त्यांचा प्रचंड अभिमान”

हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा- उद्धव ठाकरे

“उद्धव ठाकरे आज दोन भूमिकांमध्ये, त्यामुळे भाषणासाठी कान आतूरलेले”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या